Video: कॉन्सर्टमध्ये रतन टाटांच्या निधनाबद्दल कळालं अन्…; दिलजीत दोसांझचा व्हिडीओ व्हायरल
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझने जर्मनीत कॉन्सर्ट दरम्यान रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने कॉन्सर्ट थांबवून उपस्थितांना रतन टाटा यांच्या जीवनातील शिकण्यासारख्या गोष्टी सांगितल्या. दिलजीतने रतन टाटा यांचा आयुष्यावर मोठा प्रभाव असल्याचे सांगितले. त्याच्या या कृतीचे नेटकरी कौतुक करत आहेत. रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले.