३१० कोटींचे बजेट अन् ठरलेला फ्लॉप, ‘हा’ बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलात का?
'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला होता. आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ३१० कोटी रुपयांत झाली होती. मात्र, चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट फ्लॉप ठरला. कथानक दमदार नसल्याने प्रेक्षकांनी चित्रपट नाकारला. आता हा चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहे.