गायक दर्शन रावलने बेस्ट फ्रेंडशी बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्याचे फोटो पाहिलेत का?
गायक दर्शन रावलने त्याची बेस्ट फ्रेंड धरल सुरेलिया हिच्याशी खासगी सोहळ्यात लग्न केले. इन्स्टाग्रामवर 'माय बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर' असे कॅप्शन देत त्याने लग्नाचे फोटो शेअर केले. दर्शनने आयवही रंगाची शेरवानी आणि धरलने लाल लेहेंगा परिधान केला होता. चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. 'इंडियाज रॉ स्टार'मधून प्रसिद्ध झालेल्या दर्शनने 'चोगाडा', 'सोनी सोनी' यांसारखी हिट गाणी गायली आहेत.