रिलीजआधी दिग्दर्शकाचं निधन, सिनेमाने गाजवलं बॉक्स ऑफिस; जिंकले तब्बल २६ पुरस्कार
शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जब तक है जान' या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि २६ पुरस्कार जिंकले. यश चोप्रा यांच्या निधनानंतर रिलीज झालेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. चित्रपटात शाहरुखने लंडनमध्ये काम करणाऱ्या समर आनंदची भूमिका साकारली होती.