“मी माझे…”, गोविंदाने घटस्फोटाच्या चर्चांवर सोडले मौन
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा ३७ वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. गोविंदाची एका मराठी अभिनेत्रीशी कथित जवळीक हे कारण असल्याचे म्हटले जात आहे. गोविंदाने या चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हटले की, "सध्या फक्त बिझनेसबद्दल चर्चा सुरू आहेत." सुनीताला मेसेज केला पण तिने उत्तर दिलेले नाही.