सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झाली वाढ, तिसऱ्या दिवशी केली सर्वाधिक कमाई
बॉलीवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सनी देओल. आजवरच्या करिअरमध्ये सनी देओलने केलेल्या बऱ्याच चित्रपटातील भूमिका सुपरहिट झाल्या. त्याचे बरेच डायलॉग अजूनही सिनेप्रेमींना पाठ आहेत. अलीकडेच सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दोन वर्षांनंतर सनीने ‘जाट’च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं आहे. जरी बॉक्स ऑफिसवर ‘जाट’ चित्रपटाची संथ गतीने सुरुवात झाली असली तरी वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसत आहे. प्रदर्शानंतरच्या पहिल्या शनिवारी सनी देओलच्या चित्रपटाने चांगली कमाई केल्याचं समोर आलं आहे.