ये पाकिस्तान है बेटा! The Diplomatच्या टीझरमध्ये दिसली परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची झलक
अभिनेता जॉन अब्राहम लवकरच 'द डिप्लोमॅट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, त्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या क्लिपने सुरुवात होते. जॉन अब्राहमने जेपी सिंह यांची भूमिका साकारली आहे. शिवम नायर दिग्दर्शित हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा रितेश शाहने लिहिली असून, संगीत ए.आर. रहमान यांचे आहे. जॉनला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.