जुनैद खानच्या ‘लवयापा’ला हिमेश रेशमियाच्या चित्रपटाची टक्कर, दुसऱ्या दिवशीची कमाई फक्त…
आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर चर्चा सुरू आहे. ‘लवयापा’ असं जुनैदच्या नव्या चित्रपटाचं नाव असून यामध्ये तो दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी खुशी कपूरसह प्रमुख भूमिकेत झळकला आहे. ७ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या ‘लवयापा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरुवात झाली तरी दुसऱ्या दिवशी कमाईत किंचित वाढ झाली आहे. पण, जुनैद खान-खुशी कपूरच्या ‘लवयापा’ला हिमेश रेशमियाचा चित्रपट चांगलीच टक्कर देताना दिसत आहे.