कंगना रणौत यांच्या Emergency चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? वाचा
कंगना रणौत यांचा बहुचर्चित चित्रपट 'इमर्जन्सी' १७ जानेवारीला प्रदर्शित झाला. कंगनाच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरी चित्रपटाची सुरुवात संथ झाली आहे. 'इमर्जन्सी'ने पहिल्या दिवशी १ ते २ कोटींची कमाई केली असून, करोनानंतर कंगनाचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली असून, पंजाब आणि काँग्रेसकडूनही विरोध होत आहे.