कंगना रणौत- जावेद अख्तर यांच्यातील ५ वर्षे जुना वाद मिटला; न्यायालयात नेमकं काय घडलं?
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि लेखक जावेद अख्तर यांच्यातील पाच वर्षांपासून सुरू असलेला मानहानीचा खटला अखेर संपला आहे. दोघांनी वांद्रे न्यायालयात हजर राहून हा वाद सोडवला. कंगनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही माहिती दिली. तिने जावेद अख्तर यांना पुढील चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची विनंती केली असून, त्यांनी ती मान्य केली आहे.