भावाच्या मेहंदी सोहळ्यात करीना-करिश्मा, रणबीर-आलिया पंजाबी गाण्यावर थिरकले; पाहा व्हिडीओ
Aadar Jain-Alekha Advani Wedding : आदर जैन आणि अलेखा आडवाणीच्या मेहंदी सोहळ्याला करीना कपूर बहीण करिश्मा कपूरबरोबर पोहोचली होती. तर रणबीर कपूर पत्नी आलिया भट्ट आणि सासू सोनी राजदानबरोबर पोहोचला होता. सोशल मीडियावर सध्या आदर आणि अलेखाच्या मेहंदी सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामधील कपूर कुटुंबाच्या जबरदस्त डान्स व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.