सैफ अली खानला रुग्णालयात भेटायला पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा पती सैफ अली खान लीलावती रुग्णालयात दाखल आहे. वांद्रे येथील त्यांच्या घरी मध्यरात्री दरोडेखोराने हल्ला केला, ज्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याच्या मणक्याला व हाताला दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. करीना सैफला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली असून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.