“मी अंबानी कुटुंबाला ओळखत नाही”, अनंत-राधिकाच्या लग्नात आलेल्या किम कार्दशियनचे वक्तव्य
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जुलै २०२४ मध्ये झाले. या भव्यदिव्य लग्नात किम आणि ख्लोए कार्दशियन सहभागी झाल्या होत्या. किमने तिच्या शो 'द कार्दशियन्स'मध्ये सांगितले की ती अंबानी कुटुंबाला ओळखत नव्हती, पण कॉमन मित्रांमुळे ती लग्नाला आली. लग्नाचे निमंत्रण ४०-५० पौंड वजनाचे होते आणि त्यातून संगीत येत होते.