“आया रे तुफान…”, टाइम्स स्क्वेअरजवळ ‘छावा’ चित्रपटातील गाण्यावर केलेला जबरदस्त डान्स पाहा
विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेली कथा प्रेक्षकांचा खूप भावली आहे. त्यामुळे प्रेक्षक अजूनही आवर्जुन ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई करत आहे. अशातच दुसऱ्याबाजूला एका व्हिडीओची खूप चर्चा होतं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.