Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, भारतातील सर्वाधिक करणारा सहावा चित्रपट!
'छावा' चित्रपटाने २५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा'ने 'बाहुबली २' चा रेकॉर्ड मोडला असून ५१७.१८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंह यांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे.