शरद पोंक्षेंनी ‘छावा’बद्दल केलेल्या पोस्टवर मराठी अभिनेता कमेंट करत म्हणाला, “काका…”
'छावा' चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका येसूबाईंच्या आणि अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. शरद पोंक्षे यांनी चित्रपटाचं कौतुक करत व्हिडीओ शेअर केला. शुभंकर एकबोटेने त्यावर कमेंट केली. चित्रपटाने ७ दिवसांत २२० कोटींचं कलेक्शन केलं आहे.