सैफ अली खान थोडक्यात बचावला; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबद्दल माहिती, डिस्चार्ज कधी मिळणार?
सैफ अली खानच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात १६ जानेवारीला मध्यरात्री दरोडेखोर शिरला आणि झटापटीत सैफ जखमी झाला. धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. सैफची प्रकृती आता स्थिर असून तो चालायला सुरुवात केली आहे. पुढील तीन दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांनी सांगितले.