Loveyapa ची निराशाजनक सुरुवात, जुनैद खान-खुशी कपूरच्या चित्रपटाने कमावले फक्त….
आमिर खान व खुशी कपूर यांचा 'लवयापा' चित्रपट ७ फेब्रुवारीला रिलीज झाला. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट तमिळ 'लव्ह टुडे'चा रिमेक आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने फक्त दीड कोटींची कमाई केली. प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी मिळाल्याने थिएटर्स रिकामी होती. चित्रपटात जुनैद खान, खुशी कपूर, आशुतोष राणा यांच्यासह अनेक कलाकार आहेत. 'लवयापा'ची कथा गौरव आणि बानी यांच्या प्रेमाभोवती फिरते.