“अरिनला धक्का…”, माधुरी दीक्षितचा अडीच वर्षांचा मुलगा भावाला त्रास देणाऱ्याला नडलेला
'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर माधुरीने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि अमेरिकेत गेली. काही वर्षांपूर्वी ते भारतात परतले. त्यांच्या मुलांबद्दल बोलताना, माधुरीने अरिन व रायनच्या एकमेकांवरील प्रेमाची आठवण सांगितली. अरिनने रायनचे रक्षण केले आणि रायननेही लहानपणी अरिनला त्रास देणाऱ्या मुलाला विरोध केला होता.