Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या कार कलेक्शनमध्ये नवीन फेरारी 296 GTS अॅड केली आहे. या कारची किंमत ६.२४ कोटी रुपये आहे. सोशल मीडियावर या कारचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. माधुरीच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-मेबॅक S560, रेंज रोव्हर वोग आणि पोर्श 911 टर्बो एस यांचा समावेश आहे. माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.