Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”
मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी 'छावा' चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे कौतुक केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अनासपुरे यांनी महाराष्ट्रातील पालकांना आपल्या मुलांना हा चित्रपट दाखवण्याचे आवाहन केले. त्यांनी जातीयवादाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आणि चित्रपटाच्या दिग्दर्शक व कलाकारांचे अभिनंदन केले.