ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी का निवडला किन्नर आखाडा? उत्तर देत म्हणाली…
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने महाकुंभमेळ्यात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून संन्यास घेतला आहे. २३ वर्षांच्या तपश्चर्येनंतर तिला हा सन्मान मिळाला आहे. ममता म्हणते की, ती चित्रपटांमध्ये परतण्याची कल्पनाही करू शकत नाही. किन्नर आखाड्याचा भाग होण्याचा निर्णय तिने स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व म्हणून घेतला. ममता २५ वर्षांपासून दुबईत राहत होती आणि कुंभ मेळ्यासाठी भारतात येत होती.