वडिलांच्या अंत्यसंस्काराला हिंदूंपेक्षा जास्त मुस्लीम…, मनोज बाजपेयींचे वक्तव्य
बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांनी २००६ मध्ये शबाना रझाशी आंतरधर्मीय लग्न केलं. त्यांच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध केला नव्हता. मनोज यांनी सांगितलं की, त्यांच्या वडिलांनी या नात्याला समर्थन दिलं होतं. मनोज आणि शबाना आपापल्या धार्मिक श्रद्धांचे पालन करतात. त्यांच्या मुलीला धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. मनोज म्हणाले की, त्यांच्या कुटुंबात धर्मावरून कधीच भांडणं होत नाहीत.