“त्या २५ मिनिटांनी तुमचं आयुष्य बदलून जाणार…”, क्रांतीची ‘छावा’ चित्रपटावर प्रतिक्रिया
नुकताच अभिनेत्री क्रांती रेडकरने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतरचा अनुभव सांगितला आहे. तसंच विकी कौशल, रश्मिका मंदाना, आशुतोष राणा, संतोष जुवेकर अशा चित्रपटातील सर्व कलाकारांचं कौतुक केलं आहे. क्रांती रेडकर म्हणाली, “माझे डोळे आताही सुजलेले दिसतायत. मी काल ‘छावा’ हा चित्रपट बघून आलीये. हा चित्रपट समजून घेण्यासाठी खूप अवघड आहे आणि तुम्हाला माणूस म्हणून जाणीव करून देतो की, तुम्ही समाजात कुठे उभे राहत आहात?"