“मुख्य आरोपी अजूनही फरार”, मारहाण प्रकरणानंतर प्रणित मोरेचा पहिला व्हिडीओ आला समोर
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू, बॉलीवूड अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्यामुळे प्रणितवर हल्ला केला गेला. याबाबत प्रणितच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. त्यानंतर आता प्रणित मोरेने एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामधून खंत व्यक्त केली आहे.