“सलमान खानच्या विनंतीवरून कतरिना कैफचे नाव…”, मिका सिंगचा खुलासा
गायक मिका सिंग आणि सलमान खान यांची मैत्री खूप घट्ट आहे. एका मुलाखतीत मिकाने सलमानबद्दलचा एक मजेदार किस्सा सांगितला. सलमानने रात्री उशिरा मिकाला फोन करून गाणं बदलण्याची विनंती केली होती. मिकाने सांगितलं की सलमानला मध्यरात्री फोनवर बोलायला आवडतं आणि फोन न उचलल्यास तो नाराज होतो. मिकाने सलमानच्या विनंतीनुसार गाण्यातील 'कतरिना' हा शब्द 'जॅकलिना' असा बदलला होता.