रणवीर सिंहला ऑफिसमध्ये ३ तास वाट पाहायला लावली? मुकेश खन्ना म्हणाले, “मी त्याला…”
ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी 'शक्तीमान'च्या पोशाखात पत्रकार परिषद घेतली आणि रणवीर सिंगचा अपमान करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. शक्तीमानची भूमिका कोण करेल हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. रणवीर सिंग अजूनही ही भूमिका साकारण्यासाठी आतुर आहे, परंतु शक्तीमानसाठी खास चेहरा आवश्यक आहे. नवीन शक्तीमान कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही.