‘वनवास’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, चार दिवसांची कमाई साडेतीन कोटींपेक्षाही कमी
नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्या 'वनवास' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे. 'पुष्पा 2' आणि 'मुफासा' यांच्या क्रेझमुळे 'वनवास'ला प्रेक्षक मिळाले नाहीत. चार दिवसांत 'वनवास'ने फक्त ३.४० कोटींची कमाई केली आहे. समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळूनही, चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे.