नीना गुप्ता यांनी नातीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, कॅप्शनने वेधले लक्ष
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता आजी झाल्या आहेत. त्यांची लेक मसाबा गुप्ता आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा यांना मुलगी झाली आहे. नीना गुप्तांनी नातीबरोबरचा फोटो शेअर करत 'माझ्या मुलीची मुलगी' असे कॅप्शन दिले आहे. मसाबा व सत्यदीप यांनी जानेवारी २०२३ मध्ये साधेपणाने लग्न केले होते. त्यांच्या या आनंदाच्या बातमीवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.