Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राने त्याच्या गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी मुंबईत ७ फेब्रुवारीला लग्न केलं. नीलम ही अभिनेत्री आहे. लग्नसोहळ्यात चोप्रा व उपाध्याय कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, जवळचे नातेवाईक आणि काही बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. अंबानी कुटुंबीयही हजर होते. पापाराझी अकाउंट 'वूम्पला'वर शेअर केलेल्या व्हिडीओत प्रियांकाचा पती निक जोनास आणि नीता अंबानी दिसत आहेत.