अरे काय चाललंय? उदित नारायण यांनी पुन्हा चाहतीच्या ओठांचं घेतलं चुंबन; नेटकरी म्हणाले…
प्रसिद्ध गायक उदित नारायण मागील काही दिवसांपासून त्यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. एका लाइव्ह शोमध्ये महिला चाहत्यांना किस केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली. उदित यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की, "चाहते प्रेम व्यक्त करतात, याकडे फार लक्ष देऊ नये." मात्र, दुसरा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांना पुन्हा टीकेला सामोरे जावे लागले.