…तर ऋषी कपूर यांनी स्वतःचा जीव घेतला असता, नीतू कपूर असं का म्हणाल्या होत्या?
ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिने नेटफ्लिक्सच्या 'फॅब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज' शोमधून मनोरंजनविश्वात पदार्पण केले. अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही रिद्धिमाने चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तिच्या वडिलांच्या नाराजीमुळे तिने अभिनयात करिअर केले नाही. रिद्धिमाला वडिलांच्या नाराजीबद्दल माहीत असल्याने तिने अभिनय न करता कपडे डिझाइन करण्याचा निर्णय घेतला.