ऐश्वर्या रायच्या लग्नानंतर सलमान खान म्हणालेला, “अभिषेक खूप…”
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू आहेत. ऐश्वर्या कार्यक्रमांना मुलगी आराध्याबरोबर जाते, पण अभिषेकसोबत दिसत नाही. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सलमान खानचं जुनं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ऐश्वर्याशी ब्रेकअपनंतर सलमानने तिच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. त्याने अभिषेकचं कौतुक केलं होतं आणि ऐश्वर्यासाठी आनंदी असल्याचं म्हटलं होतं.