ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातील घरात सापडलेली अलका याज्ञिकची ही गोष्ट
९० च्या दशकातील लोकप्रिय गायिका अलका याज्ञिक यांच्या आवाजाचे चाहते जगभरात आहेत, ज्यात ओसामा बिन लादेनचाही समावेश होता. २०११ मध्ये ओसामाच्या एन्काउंटरनंतर त्यांच्या घरातून अलका याज्ञिक, कुमार सानू आणि उदित नारायण यांच्या गाण्यांच्या कॅसेट सापडल्या. अलका याज्ञिक यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "ओसामा कोणताही असो, त्याला माझी गाणी आवडत असतील तर हे चांगलंच आहे."