All We Imagine As Light: भारताचं दुसऱ्या गोल्डन ग्लोबचं स्वप्न भंगलं
‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याला दोन वर्षांपूर्वी गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला होता. यावर्षी भारतीय चित्रपट ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळालं होतं. मात्र, पायल कपाडियाच्या या चित्रपटाने नॉन-इंग्लिश फीचर कॅटेगरीतील सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर पुरस्कार गमावला. जॅक ऑडियर्ड यांच्या म्युझिकल क्राइम कॉमेडी ‘एमिलिया पेरेझ’ने हा पुरस्कार जिंकला.