ओरीसह ७ जणांविरोधात तक्रार दाखल, वैष्णोदेवीमध्ये केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे अडचणीत
बॉलीवूड सेलिब्रिटींचा मित्र ओरहान अवत्रामणी (ओरी) वादात सापडला आहे. जम्मू-कश्मीरच्या कटरा येथील हॉटेलमध्ये मद्यप्राशन केल्याबद्दल ओरीसह आठ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. वैष्णोदेवी बेस कॅम्प परिसरात मद्यपान आणि मांसाहारावर बंदी असूनही त्यांनी नियम मोडले. एसएसपी रियासी परमवीर सिंह यांनी या आठ जणांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. ओरीने अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही.