Video: प्रभू देवाच्या मुलाला पाहिलंत का? बाप-लेकाने पहिल्यांदाच केला एकत्र परफॉर्मन्स
Prabhu Deva Son Rishii Raghavendra Deva: प्रभू देवाने आपल्या डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्रभू देवाच्या डान्सचे जगभरात चाहते आहेत. त्याला अनेकजण गुरू मानतात. प्रभू देवा डान्स व्यतिरिक्त निर्माता, अभिनेता म्हणून आता काम करताना दिसतो. असा हा हरहुन्नरी डान्सर प्रभू देवाने आता त्याच्या मुलाला सगळ्यांसमोर आणलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.