“प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांना न बोलवून दिवंगत आई स्मिता पाटील यांना दुखावलं”
बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने व्हॅलेंटाईन डेला त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं. हे लग्न त्याने दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या घरी खासगी समारंभात केलं. मात्र, त्याने वडील राज बब्बर आणि सावत्र भावंडं आर्या व जुही यांना आमंत्रण दिलं नाही. आर्यने याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि वडील राज बब्बर दुखावले असल्याचं सांगितलं. प्रतीकच्या या निर्णयामुळे कुटुंबात नाराजी आहे.