नणंद असावी तर अशी! भावाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
प्रियांका चोप्राचा धाकटा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच नीलम उपाध्यायशी लग्न करणार आहे. संगीत सोहळ्यात प्रियांका व तिचा पती निक जोनास सहभागी झाले होते. प्रियांकाने नीलमचा ड्रेस नीट करून दिला, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीलम ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. सिद्धार्थ व नीलम मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि गेल्या वर्षी त्यांनी रोका सेरेमनी केली होती.