Video: प्रियांका चोप्राच्या भावाने प्रसिद्ध अभिनेत्रीशी केलं लग्न, पाहा खास व्हिडीओ
प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा अभिनेत्री नीलम उपाध्यायशी लग्नबंधनात अडकला आहे. त्यांच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. सिद्धार्थने आयव्हरी रंगाची शेरवानी तर नीलमने लाल लेहेंगा परिधान केला होता. प्रियांकाने आकाशी रंगाचा इंडो वेस्टर्न लेहेंगा घातला होता. लग्नाच्या कार्यक्रमात निक जोनास व कुटुंबीय सहभागी झाले होते. सिद्धार्थचे प्रियांकाच्या प्रॉडक्शन हाऊस व हॉटेल व्यवसायात योगदान आहे.