‘पुष्पा द रुल’ हा सुकुमारचा सुमारपट! अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या अभिनयाची जादूही फिकीच!
'पुष्पा 2' हा अल्लू अर्जुनचा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. सुकुमारने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा कथानक, गाणी आणि अभिनय या सर्वच बाबतीत कमी पडतो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा अभिनय फिका वाटतो. फहाद फासिलचा व्हिलनही प्रभावी नाही. 'पुष्पा द बिगनिंग'च्या तुलनेत हा सिक्वल निराशाजनक आहे. प्रेक्षकांना सिनेमा सहन करावा लागतो हे वास्तव आहे.