स्मिता पाटील यांची सावत्र मुलगी ‘या’ अभिनेत्याची आहे दुसरी पत्नी; जुही पतीबद्दल म्हणाली…
अभिनेत्री जुही बब्बर, राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांची मुलगी, 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेता अनुप सोनीची दुसरी पत्नी आहे. अनुपसोबतच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली होती. अनुपच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुली होत्या. जुहीचं पहिलं लग्न चित्रपट-निर्माता बिजॉय नांबियारशी झालं होतं, पण २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. जुहीच्या आई-वडिलांनी तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काळजी व्यक्त केली होती, पण अनुपवर विश्वास ठेवला. त्यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली असून त्यांना इमान नावाचा मुलगा आहे.