Video: पापाराझींनी आवाजात देताच राहाची ‘ती’ कृती; आलिया-रणबीर लेकीला पाहून लागले हसायला
रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लेक राहा कपूर सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी स्टार किड्स झाली आहे. राहाचा गोड अंदाज नेहमी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. राहाचा आता वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकतीच राहा आई-बाबा रणबीर-आलियाबरोबर मुंबई विमानतळावर पाहायला मिळाली. यावेळी राहाच्या एका कृतीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.