“…म्हणून बॉलीवूडवर संकट घोंघावत आहे”, अभिनेता रणदीप हुड्डा असा का म्हणाला? जाणून घ्या…
बॉलीवूडमध्ये सध्या बरेच जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचं सत्र सुरू आहे. पण, यामधील मोजक्याचं चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. ‘सनम तेरी कसम’, ‘रॉकस्टार’, ‘रहना है तेरे दिल में’ अशा काही चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली. बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या याच ट्रेंडविषयी बोलताना अभिनेता रणदीप हुड्डाने आपलं परखड मत व्यक्त केलं.