माधुरी दीक्षितवर प्रेम, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन्…; भारतीय क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी
सिनेविश्व आणि क्रिकेट यांचं नातं खूप जवळचं आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा, अथिया शेट्टी-केएल राहुल यांसारख्या जोडप्यांप्रमाणेच, एकेकाळी क्रिकेटपटू अजय जाडेजा आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची प्रेमकहाणी चर्चेत होती. मॅगझिनच्या फोटोशूटदरम्यान दोघांची भेट झाली आणि प्रेम फुललं. मात्र, मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे त्यांचं नातं तुटलं. माधुरीने डॉ. नेनेंशी लग्न केलं, तर अजयनेही दुसरी जोडीदार निवडली. आता अजय जाडेजा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे.