अमृता सिंहने घेतले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे अपार्टमेंट, ९० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी अन्…
प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंहने मुंबईच्या जुहू येथे १८ कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटसाठी तिने ९० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले. अमृताने मागील वर्षी अंधेरी पश्चिम येथे २२.२६ कोटी रुपयांची दोन कार्यालये खरेदी केली होती. सध्या ती चित्रपटांपासून दूर असून, मुलगा इब्राहिम आणि मुलगी सारा अली खानसोबत राहते.