मोठी बातमी! सैफ अली खानवर चाकू हल्ला, अभिनेता गंभीर जखमी
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे (पश्चिम) येथील घरात दरोडेखोराने चाकू हल्ला केला. गुरुवारी पहाटे अडीच वाजता सैफ कुटुंबियांसह झोपला असताना ही घटना घडली. सैफ जखमी झाला असून, घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि तक्रार दाखल करणार आहेत. बातमी अपडेट होत आहे.