Video: हाताला पट्टी अन् पोलीस बंदोबस्तात घरी पोहोचला सैफ अली खान, पाहा व्हिडीओ
सैफ अली खान पाच दिवसांनंतर लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतला आहे. गुरुवारी घरात घुसलेल्या दरोडेखोराने सैफवर हल्ला केला होता, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. करीना कपूर खानने रुग्णालयात सैफला भेट दिली होती. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामला पोलिसांनी अटक केली आहे. तो बांगलादेशातून चोरीच्या उद्देशाने भारतात आला होता. सैफच्या इमारतीत घुसण्याआधी त्याने इतर बॉलीवूड स्टार्सच्या बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.