Video: हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झाली मदतनीस
अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरी दरोडेखोराने हल्ला केला. सैफ व दरोडेखोर यांच्यात झटापट झाली, ज्यात सैफ गंभीर जखमी झाला. मदतनीसही जखमी झाली. इब्राहिम अली खान व कुणाल खेमू यांनी सैफ व मदतनीसला रुग्णालयात नेले. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पोलिसांनी आरोपीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याचा शोध घेत आहेत.