सैफ अली खानची हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया; करीनाबद्दल म्हणाला, “तैमूरने मला विचारलं…”
अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी २०२५ रोजी वांद्रे येथील घरात हल्ला झाला. मुलांना वाचवताना सैफ गंभीर जखमी झाला. सैफने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने त्याचा कुर्ता रक्तस्त्रावाने लाल झाल्याचे सांगितले. तैमूर, जेह आणि करीना त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ऑटो शोधत होते. तैमूरने त्याच्याबरोबर रुग्णालयात येण्याचा आग्रह धरला होता.